
Rajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?
Rajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?
विधानसभा निवडणुकीत. हॉट मुद्दा बनला. भाजपा आमदार पराग अळवणीच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. हसत खेळत गप्पा टप्पा झाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नारवेकरही यावेळी उपस्थित होते. नारवेकरांनी चंद्रकांत दादांना उद्देशून मग युती कधी या प्रश्नाची गुगली टाकली. चंद्रकांत पाटलांनीही आपण त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं उत्तर देत सिक्सर मारला. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नारवेकरांमध्ये हशा पिकला. हाक्षण कॅमेरात कैद झाला आणि चर्चा रंगली ती राज्यातल्या पुन्हा एकदा नव्या समीकरणाची. लग्नातल्या भेटीची गाठ राजकीय युतीपर्यंत मारली गेली. चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षांमध्ये हे पण तुम्हाला मी सांगतो. कारण आम्ही एकत्र. सरांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आता इतकी सगळी चर्चा सुरू असताना या चर्चेला जबाबदार असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी भेटीची इनसाईड स्टोरी काय सांगितली? आणि ते शूट केलं आणि जवळ बहुदा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो आता काय होणार पण उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमधली भेट कुणाचीतरी अस्वस्थता वाढवणारी ठरू शकते. याला कारण आहे गेल्या काही दिवसातल्या घटना आणि त्या घटनांच्या केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अगदी सरकार स्थापनेपासून आतापर्यंत शिंदेंच्या नाराजीची चर्चा पुन्हा. जोरात आहे. पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिंदे प्रयत्नशील होते. पालकमंत्री पद वाटपावरून नाराज झालेल्या शिंदेंनी थेट दरे गाठलं. भाजपाच्या गणेश नायकांनी थेट शिंदेंच्या ठाण्यातच जनता दरबार घेण्याची घोषणा करून टाकली. एकीकडे एकनाथ शिंदेंच नाराजी नाट्य कायम असतानाच भाजपाच्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंशी यांना त्या कारणान झालेल्या भेटीगाठीमुळे राजकीय चर्चांना जोर आलाय. परंतु विधानसभेला दारुण पराभव झाल्यानंतर माननीय उद्धव ठाकरे हे आपल्याला पाहायला मिळालं की नागपूरला देखील ज्यांना कलंक म्हटलं, टरगुजा म्हटलं, काय काय वाटेल तशी त्यांना विशेषण लावली, त्यानंतर पुष्पगुच्छ घेऊन जाणं आणि पुन्हा आदित्य ठाकरे वारंवार. देवेंद्र फडणवीस यांना भेटणं, मला असं वाटत त्यांच्या केडरला कुठेतरी ते इकडे तिकडे जाऊ नये. कार्यकर्ते अजूनही शिंदे साहेबांकडे येऊ नये किंवा भाजप मध्ये जाऊ नये. हे सगळं रोकण्यासाठी या सगळ्या युक्त्या आहेत की काय असा दाट संशय मला येतो. तसं पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंसारख्याच भेटीगाठीचा राज ठाकरेंनाही अनुभव आहे. आणि त्यांनी आपला अनुभव पदाधिकाऱ्यांशी शेअर करताना एक किस्साही सांगितला.