Rajesh Tope on Omicron : राज्यात लगेचच निर्बंध नाहीत : राजेश टोपे ABP Majha
Continues below advertisement
राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत असले तरी राज्यात तात्काळ निर्बंध लावण्यात येणार नाहीत असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून, त्यानंतर टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येतील असं टोपेेंनी स्पष्ट केलं आहे. राजकीय सभा आणि बैठकांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन काटेकोर नियमांची अंमलबजावणी करणार असल्याचा इशाराही टोपे यांनी दिला आहे. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची आठवड्याला आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी असं आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
Continues below advertisement