Rajesh Tope : पहिली ते चौथीच्या शाळांबाबत उद्या निर्णय? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले...

Continues below advertisement

Maharashtra School Opening : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टींमध्ये शिथिलता येत आहे. महाविद्यालयं, पाचवी ते दहावी शाळा सुरु झाल्यानंतर आता पहिली ते चौथी शाळा सुरु होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. टोपे म्हणाले की,  पहिली ते चौथी सर्व विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत.  त्यांचे लसीकरण केले पाहिजे. 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा मुद्दा मांडला गेला आहे. पहिली ते चौथी शाळा सुरु करायला परवानगी द्यावी असंही म्हटलं आहे. उद्या कॅबिनेट आहे, या बैठकीत अंतिम निर्णय होईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ना हरकत दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram