Ganesh Utsav 2021: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधांतून सूट?; आरोग्यमंत्री म्हणतात...

Continues below advertisement

जालना : कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाला (Ganesh Utsav 2021 )सुरूवात होणार असून सरकार, आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कोकणातील गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी, चाकरमान्यांचं आगमन या साऱ्या पार्श्वभूमीवर आता कोकणातील सर्वच जिल्हा प्रशासन सतर्क झाली आहेत. मात्र गणेश उत्सवाच्या काळात चाकरमान्यांना कोरोनाच्या निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. जनहितासाठी शासनाच्या या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. सर्व नियम विचार करूनच घेतले जातात. त्यामुळे यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन टोपे यांनी केलं आहे. कोकणात येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस अनिवार्य करण्यात आले आहेत. दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयाविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे गणेशउत्सवात कोरोनाच्या या निर्बंधातून सूट मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram