Rajesh Tope आणि Mansukh Mandaviya यांची भेट: नेमकी कशावर होणार चर्चा? ABP Majha
Continues below advertisement
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या करोना लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत टोपे मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते. कोवॅक्सिन लसीच्या दोन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. मात्र कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमध्ये ८४ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रा मधील अंतर कमी केले, तर लसीकरणाच्या वेगाला गती देता येईल. याबाबत विचार करण्याची विनंती टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांना केली.
Continues below advertisement