Rajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

Continues below advertisement
महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजवरचा अनुभव आहे की, जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्र पक्षालाला त्याचा फायदा होतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. मला विश्वास आहे की त्याचा फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार स्थापन होईल असे फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरुन मुंबईला रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली

यावेळी महिलांचा देखील मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसत आहे. मी काही मतदारसंघात संपर्क केले, तिथून मला फीडबॅक मिळाला आहे की महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याचे फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदारांची टक्केवारी वाढल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील फडणवीस म्हणाले. आम्ही अजूनही कोणत्याही अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधला नसल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्रीपदा संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. परवा निकाल आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि चांगला निर्णय करु अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने वाढली आहे, कारण लोकांना सरकारबद्दल थोडी आपुलकी वाटते असं त्याचा अर्थ असल्याचे फडणवीस म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram