Rajendra Pawar Vs Ajit Pawar : मी राजकारणात आलो असतो तर आधीच फूट पडली असती...
Continues below advertisement
Rajendra Pawar Vs Ajit Pawar : "मी राजकारणात आलो असतो तर आधीच फूट पडली असती..."
बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालं आहे. बारामतीकरांची भूमिका या नावाने हे पत्र सोशल मीडियावर शेअर होतंय. बारामतीकरांच्या नावाने हे पत्र असलं तरी अजित पवारांवर टीका करणारं आहे. तसंच पत्राच्या शेवटी वाजवा तुतारी गाडा गद्दारी, असा स्पष्ट उल्लेख आहे. या पत्राविषयी राजेंद्र पवारांशी बातचीत केली असता, जेव्हा लोकांना दबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा पत्रातून व्यक्त होतात, असं सांगून त्यांनी पत्राचं समर्थन केलं.. तर निनावी पत्रावरुन राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला..रोहित पवारांना सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.
Continues below advertisement