Rajan Salvi On Uday Samant : पत्रकार परिषदेतून राजन साळवी यांची उदय सामंतांवर टीका
Rajan Salvi On Uday Samant : पत्रकार परिषदेतून राजन साळवी यांची उदय सामंतांवर टीका
उदय सामंत यांनी किती पक्ष बदलले आणि कशी मंत्री बदल मिळवले हे सांगावे... त्यांनी मला निष्ठा शिकवू नये.... शिंदे गटात जाण्यासाठी मला अनेक प्रलोभनं आली... एसीबी चौकशी मागे लागली... पण मी निष्ठेने ठाम शिवसेनेत राहिलो... येणारा निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी राहील... 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हा राजन साळवी विजयी चौकार मारेल... तसेच उदय सामंतांना पराभूत करणे हे आम्ही निश्चित केलेले असल्यास देखील राजन साळवी यांनी राजापूर येते पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.... 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील... पण शिवसेना त्यांचा पराभव करेल... असं मोठं विधान सामंत यांच्याबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांनी केले आहे... उदय सामंत हे कुणाचेही होऊ शकत नाहीत... त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला... स्थानिकांचा विरोध असताना देखील उदय सामंत यांना 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश दिला गेला.. त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मेहनत घेतली... असं देखील राजन साळवी यांनी म्हटला आहे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी देत असताना डावलले जात असल्याचं देखील राजन साळवी यांनी राजापूर येथील पत्रकार परिषदेमध्ये म्हटला आहे किरण सामंत यांच्या रूपाने भविष्यात प्रत्येकाला आपला वाटणारा आणि घरातला आमदार मिळेल अशी टीका उदय सामंत यांनी राजन साळवी यांचं नाव न घेता केली होती. त्याला आता राजन साळवी यांनी उत्तर दिले आहे. मी एकाच पक्षात मागची 40 वर्ष काम करत आहे. नगरसेवक, जिल्हाप्रमुख आणि आमदार अशी विविध पद मी भूषवली आहेत. सर्वांच्या सुखदुःखात मी नेहमीच सहभागी झालो आहे. अगदी बार्शी आणि पाचवीला देखील मी गेलो आहे. काही वर्षांपूर्वी रत्नागिरीतील हातखंबा येथे एक अपघात झाला होता. त्या सर्वांना घेऊन आम्ही जिल्हा रुग्णालयामध्ये आलो. त्यावेळी एक लहान बाळ दुधासाठी रडत होतं. अशावेळी माझ्या वहिनीने त्या बाळाला आपल्या अंगावरच दूध दिलं होतं. अशी आम्ही माणस आहोत.. असं प्रत्युत्तर देखील राजन साळवी यांनी सामंत बंधू यांना दिले आहे. राजापूर इथं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलला मंजुरी मिळाल्याचं सामंत सांगतात. पण त्यासाठी जागा ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिले गेली. असं असलं तरी हॉस्पिटलच्या इमारतीसाठी एक रुपया देखील मंजूर नाही. केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून सर्व काही केले जात असल्याचे देखील राजन साळवी यांनी म्हटला आहे. मागच्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावरून कोकणात ठाकरे आणि शिंदे यांचे लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते आरोप - प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले.