Rajan Salvi On Eknath Shinde : शिवसेनाप्रवेशापूर्वी ठाण्यात भेट,शिंदेंनी साळवींना काय आश्वासन दिलं?
Rajan Salvi On Eknath Shinde : शिवसेनाप्रवेशापूर्वी ठाण्यात भेट,शिंदेंनी साळवींना काय आश्वासन दिलं?
जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे गुरुवारी ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील आनंदाश्रमात शक्तीप्रदर्शन करत राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहेत. तत्पूर्वी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उदय सामंत, किरण सामंत आणि राजन साळवी (Rajan Salvi) यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यातील अंतर्गत वाट मिटवून या दोघांमध्ये समेट घडवून आणला. तब्बल दोन तास ही बैठक सुरु होती. ही बैठक संपल्यानंतर किरण सामंत (Kiran Samant) आणि राजन साळवी हे एकाच गाडीतून बाहेर पडले. राजन साळवी यांनी या बैठकीनंतर समाधान व्यक्त केले. तर किरण सामंत आणि उदय सामंत (Uday Samant) यांनीही वाद मिटल्याचे संकेत दिले.
राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि आहेत. परंतु, मला असं वाटत नाही. एकनाथ शिंदे यांना पटकन पक्ष्यांमध्ये घेतील किंवा पक्षांमध्ये एखादी विधान परिषदेची जागा देतील. ही पूर्णपणे अफवा आहे. असे निर्णय घेताना मला आणि उदय सामंत यांना एकनाथ शिंदे नक्कीच विचारात घेतील, अशी मला खात्री आहे, असं किरण सामंत यांनी म्हटले होते. त्यामुळे किरण सामंत यांचा राजन साळवींच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाला विरोध असल्याची चर्चा होतील. परंतु, एकनाथ शिंदे यांनी सामंत बंधू आणि साळवींना समोरासमोर बसवून या वादात यशस्वी तोडगा काढल्याचे तुर्तास दिसत आहे.