ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024

Continues below advertisement

दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राज्यातील अनेक मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवारांचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सामना झाल्यानंतर आता युगेंद्र पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर असणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात पवार कुटुंब एकमेकांसमोर असणार आहेत. 

बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. शरद पवार आणि अजित पवार दोघेही प्रत्येक गावात जाऊन लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील फिरताना दिसत आहेत. यावरुन अजित पवारांनी भाष्य केलं होतं. बोल भिडू या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान, शरद पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram