ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 04 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 04 August 2024

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, मुंबईसह कोकणाला ऑरेंज तर पालघर, पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा 

खडकवासलातून विसर्ग २७ हजार क्युसेकपर्यंत वाढवला, मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, सुरक्षिततेसाठी काही घरांचा वीजपुरवठा बंद

कोयना, महाबळेश्वर परिसरात पावसाची रिपरिप सुरुच, कोयना धरणातून ४५ हजार क्युसेक वेगानं पाण्याची आवक, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे नऊ फुटांवर स्थिर

लोणावळा शहरात मुसळधार पाऊस, २४ तासांत २३२ मिलीमीटर पावसाची नोंद, पहाटेपासून पुन्हा जोरदार पाऊस...यंदा आतापर्यंत १६० इंच पावसाची नोंद...

नाशिक शहर आणि जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार, रामकुंडावरची मंदिरं गेली गोदावरीच्या पाण्याखाली, नांदूर मधमेश्वरमधून सर्वाधिक ३६ हजार वेगानं विसर्ग...

ओबीसी आरक्षणाला १०० टक्के धोका, कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, १९० कुणबी मराठा आमदारांपैकी फक्त ११ आमदार ओबीसी असल्याचा दावा...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram