Nashik MNS Raj Thackeray : मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत, राज ठाकरेंचा नाशिक दौरा
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवरुन सरकारवर ताशेरे ओढलेत. सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा हा मुद्दा आहे आणि म्हणून तिथे सोयीनुसार, सत्ता स्थाप करण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला गेला असं ते म्हणाले. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरी ईडी कारवाईबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलंय. 'ते' गृहमंत्री ईडीला 'वेडे' समजलेत बहुदा, असं म्हणत राज ठाकरेंनी उपरोधिक टोला लगावला आहे.