Namo Tourism Row: 'एकही नमो सेंटर उभं केलं तर फोडून टाकू', Raj Thackeray यांचा Shinde सरकारला थेट इशारा
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील राजकीय संघर्ष 'नमो टुरिझम' (Namo Tourism) केंद्रामुळे पेटला आहे. 'मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करायची?' असा थेट सवाल राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. सरकारने रायगड, शिवनेरी, राजगड आणि प्रतापगड यांसारख्या किल्ल्यांवर 'नमो टुरिझम इन्फॉर्मेशन अँड फॅसिलिटी सेंटर' उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेत, 'एकही सेंटर उभं केलं की फोडून टाकणार,' असा सज्जड इशारा दिला. यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, ही केंद्रे गडांवर नव्हे, तर पायथ्याशी उभारली जाणार असून अपुऱ्या माहितीमुळे राज ठाकरे टीका करत आहेत. एकेकाळी सख्य असलेले शिंदे आणि राज ठाकरे आता राजकीय विरोधक बनल्याचे चित्र या वादामुळे स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement