Maharashtra Politics: '...सेंटर उभं केलं की फोडून टाकणार', Raj Thackeray यांचा CM Shinde यांना थेट इशारा

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून, भाजप (BJP) नेत्यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?', असा घणाघाती सवाल राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे. शिवनेरी, रायगडासारख्या किल्ल्यांवर 'नमो टुरिझम सेंटर' (Namo Tourism Centre) उभारण्याच्या सरकारच्या निर्णयावर ते संतापले. असं कोणतंही सेंटर उभं केल्यास ते फोडून टाकू, असा थेट इशारा त्यांनी दिला. याशिवाय, मतचोरीच्या (vote theft) मुद्द्यावरूनही त्यांनी आवाज उठवला आणि येत्या १ तारखेच्या मोर्चाला स्वतः लोकलने येणार असल्याचं जाहीर केलं. यावर भाजपने पलटवार केला आहे. 'जिंकले की लोकशाही जिंकते आणि हरले की EVM,' असं म्हणत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. तर केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मतचोरीच्या सादरीकरणाला 'खोदा पहाड, निकला चुहा' असं संबोधत, पुरावे निवडणूक आयोगासमोर का सादर केले नाहीत, असा प्रश्न विचारला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola