Raj Thackeray Corona : राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, परंतु कोणतीही लक्षणं नाहीत आणि तब्येतही उत्तम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ही आता कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला कोरोना झाला आहे. राज ठाकरेंना सध्या क्वारंटाईन करण्यात आल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनं माहिती दिली आहे. दरम्यान राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींचे लशीचे दोन डोस पूर्ण झाले होते.