Raj Thackeray Statement : माझा व्हिजन मध्ये राज ठाकरे बोलले, चर्चेला तोंड फुटले
Raj Thackeray Statement : माझा व्हिजन मध्ये राज ठाकरे बोलले, चर्चेला तोंड फुटले
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश मतदारसंघात आपल्या पक्षाला जागा न सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच, इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरीही करण्यात येत आहे. बंडखोर उमेदवारांच्या नेतृत्वात स्थानिक नेतेमंडळी व पदाधिकारीही आक्रमक भूमिका घेऊन पक्ष सोडण्याचा विचार करताना दिसून येतात. काही ठिकाणी पक्षातून बंडखोरी केल्यानंतर दुसऱ्या पक्षातही जाण्याचा निर्णय घेतला गेल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीचे (MVA) व महायुतीमध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नगर शहर विधानसभेच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील नगर शहर विधानसभेच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला होता. अनेक वर्षांपासून शहरात शिवसेनेचा उमेदवार असल्याने ही जागा सेनेला मिळावी, अशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात नगरची ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. येथील महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशा निंबाळकर तसेच शहर प्रमुख अरुणा गोयल यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम करत थेट राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी, महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.
शिवसेना पक्ष कोणत्याही निर्णयात महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्याने या महिला पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे, येथील लढतीत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली असून सध्या येथील जागेवर विद्यमान आमदार हेही संग्राम जगतापच आहेत.