Shivshahir Aani Mi : Raj Thackeray यांच्या आठवणीतले शिवशाहीर Babasaheb Purandare : ABP Majha

Shivshahir Babasaheb Purandare Passed Away : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.  बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं आणि सकाळी साडेदहा वाजता शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola