Maharashtra Politics: 'मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करणार?', राज ठाकरेंचा Eknath Shinde यांना सवाल

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे, तर दुसरीकडे शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला यश आले आहे. 'स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?' असा थेट सवाल राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. शिवनेरी, रायगड, राजगडावर 'नमो टुरिझम सेंटर' उभारण्याच्या सरकारच्या निर्णयाला त्यांनी कडाडून विरोध केला असून, हे सेंटर उभारल्यास फोडून टाकू, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, नागपूरमधील शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाला असून, सरकारने ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफीवर अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी आणि मनसेच्या बैठकीला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola