Raj Thackeray यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन; नातू कियांशच्या उपस्थितीत झालं स्वागत
राज ठाकरेंच्या घरी किआनच्या रुपाने बालगणेश घरी आल्याने गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राज ठाकरे हे आजोबांच्या भूमिकेत दिसले. गणरायाची विधिवत पूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर अमित, मिताली आणि नातू किआनचे फोटो स्वत: राज ठाकरे काढताना दिसले. आजोबांच्या भूमिकेत असलेले राज ठाकरे मात्र आपले आजोब प्रबोधकार ठाकरे यांची प्रथा पुढे सुुरु ठेवणार आहेत. गणपतीची मुर्ती विसर्जित न करता तिचं फक्त शास्त्रोक्त विसर्जन करुन पुन्हा पुढल्यावर्षी प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे.