Thackeray Alliance: 'आता आम्ही एकत्र, आमच्यामध्ये कुणी येणार नाही'; Uddhav Thackeray यांच्या वक्तव्यानंतरही Raj Thackeray सावध
Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. 'निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचं आहे, कुणासोबत होणार हा आताचा विषय नाही,' असं सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केलं आहे. विशेष म्हणजे, याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना आपल्या शेजारी बसवून 'आता आम्ही एकत्र आहोत, आमच्यामध्ये कुणी येणार नाही' असं म्हणत युतीचे संकेत दिले होते. मात्र, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement