Raj Thackeray on Toll : टोलचा निधी कुणाच्या खिशात जातो ? - राज ठाकरे
Continues below advertisement
Raj Thackeray on Toll : टोलचा निधी कुणाच्या खिशात जातो ? - राज ठाकरे मुंबईत टोलचा मुद्दा पुन्हा पेटणार असं दिसतंय. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलवसुलीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शनिवारी भेट घेणार आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईच्या पाचही टोलनाक्यांवर केलेलं व्हिडीओ रेकॉर्डिंग, वाहनांची आकडेवारी, आणि टोल कंपनीनं दाखवलेले आकडे हे सगळा ताळेबंद राज ठाकरे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. माझा विरोध टोलला नाही, तर टोलवसुलीला आहे.. मुंबईच्या टोलनाक्यांवर किती टोल जमा होतो याची कुठलीही आकडेवारी दिली जात नाही, तो टोल कुणाच्या खिशात जातो हे देखील जनतेला कळत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
Continues below advertisement