Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ; ऐन मोक्याच्या वेळी शस्त्र झाडावर ठेवू नका : Raj Garjana

Continues below advertisement

Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ; ऐन मोक्याच्या वेळी शस्त्र झाडावर ठेवू नका : Raj Garjana

आगामी निवडणुकीत बेसावध राहू नका. शमीच्या झाडावरील शस्त्र आता उतरवा. ही क्रांतीची वेळ आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे. या सगळ्यांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जनतेला केले आहे. दसऱ्यानिमित्त राज ठाकरेंचा पॉडकास्ट प्रसारित करण्यात आला. यातून राज ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. 

राज ठाकरे म्हणाले की, आज दसरा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक.  या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. दसरा म्हटलं की, आपण सोनं लुटणे आणि एकमेकांना शुभेच्छा देणे हे आपण दरवर्षी करतो. महाराष्ट्राचं सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटत आहोत. आपल्याजवळ आपट्याची पानं सोडून दुसरे काही राहत नाही. मात्र आमचं दुर्लक्ष. आम्ही आमच्या स्वतःच्या आयुष्यात मजगुल तर कमी कधी आम्ही जातिपाठीत मजगुल आहोत. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी? आजचा दसरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावर आहे. अशा वेळेला तुम्ही बेसावध राहून चालणार नाही. 

नुसते रस्ते बांधणे आणि उड्डाणपूल बांधणे ही प्रगती नाही

दरवर्षी तुम्ही बेसावध राहतात आणि हे राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. या सगळ्यात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे? नुसते रस्ते बांधणे आणि उड्डाणपूल बांधणे ही प्रगती नसते. आमच्या हातात मोबाईल आले कलर टीव्ही आले, तुमची गॅजेट्स म्हणजे प्रगती नव्हे. प्रगती समाजाची व्हावी लागते. अजूनही आपण चाचपडतच आहोत. पण, इतक्या वर्षांच्या तुम्हाला प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्यातला राग व्यक्त होताना मला दिसत नाही. त्याच लोकांना दरवेळेस निवडून देतात आणि नंतर पश्चातापाचा हात कपाळावर मारत राहायचा आणि नंतर पाच वर्षा बोंब मारायची.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram