Raj Thackeray on Jay Malokar: हार्टअटॅकने निधन, कार्यकर्त्याच्या कुटुंबियाला राज ठाकरेची भेट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray on Jay Malokar: हार्टअटॅकने निधन, कार्यकर्त्याच्या कुटुंबियाला राज ठाकरेची भेट
नसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज अकोल्यातील दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेतलीय. अकोल्यातील मोठी उमरी भागातल्या जय मालोकार यांच्या घरी राज ठाकरेंनी ही भेट घेतलीय. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या संघटनात्मक आढाव्यासाठी राज ठाकरे अकोल्यात आले होतेय. गेल्या महिन्यात 31 जुलैला अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यात झालेल्या राड्यानंतर जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होताय. व्हिओ : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज अकोल्यातील पक्षाचे दिवगंत कार्यकर्ते जय मालोकार यांच्या कुटूंबियांची भेट घेतलीय. गेल्या महिन्यात 31 जुलैला अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यात राडा झाला होताय. या राड्यानंतर जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होताय. जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष होतेय. याबरोबरच जय मालोकर हा परभणी येथे होमिओपॅथी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्य तिसऱ्या वर्षाला शिकत होताय. आमदार मिटकरी याच्या गाडी तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जय मालोकर यांचं नाव होतंय. दरम्यान, जय यांच्यासोबत घातपात झाल्याचा गंभीर आरोप जय मालोकारांच्या आईने केलाय.