Raj Thackeray MNS | बोरिवलीत मेळावा, मातोश्री भेटीनंतर पहिलीच सभा!
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा बोरिवलीमध्ये मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मनसेच्या नेत्यांपासून शाखाध्यक्षांपर्यंत सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर असेल. सकाळी दहा वाजता राज ठाकरे या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "आज या मेळाव्यामध्ये काय काय होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे निर्णय आगामी काळाच्या दृष्टीने होतील का," असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आगामी काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.