Maharashtra Agriculture Minister | दत्तात्रय भरणेंना कृषी खातं, शेतकरी पुत्राला न्याय देण्याचा प्रयत्न.
दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खातं मिळाल्याचं समाधान असल्याचं त्यांनी म्हटलं. "मी पण शेतकरी पुत्र आहे त्यामुळे कृषी मंत्रीपद मिळाल्याचा एक निश्चित प्रकारे एक मला समाधान आहे आणि निश्चित प्रकारे या विभागाच्या माध्यमातून भविष्यकाळामधे या विभागातून माझ्या शेतकरी बांधवांना योग्य तो न्याय कसा देता येईल यासाठी भविष्यामधे माझा प्रयत्न राहणार आहे," असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी आणि समस्या यांची आपल्याला माहिती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी योग्य धोरणे राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र, शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर बोलणं त्यांनी टाळलं. कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी सांगितलं. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. इंदापूर येथून ही माहिती समोर आली आहे.