Raj Thackeray Kankavali Sabha : राज ठाकरे स्टेजवरुन उतरताच नारायण राणेंच्या पत्नी म्हणाल्या...
Raj Thackeray Kankavali Sabha : राज ठाकरे स्टेजवरुन उतरताच नारायण राणेंच्या पत्नी म्हणाल्या...
Raj Thackeray Speech , कणकवली, सिंधुदुर्ग : "मी पक्षाची स्थापना केली होती, तेव्हा एक उदाहरण दिले होते. आज पुन्हा ते उदाहरण देतो. मी मलेशियाला गेलो होतो. तिथे जेंटिक हायलंड नावाची एक जागा आहे. आता अनेक लोक गेली असतील. मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे केवळ एक हॉटले होतं. साधारण ते मुंबई ते माथेरान एवढं अंतर होतं. तिथे पोहोचलो. मी सहज आपला चोची मारत होतो. विचारपूस केली. म्हटलं इथे काय आहे? ते म्हणाले इथं कसिनो आहे. त्यानंतर मी संध्याकाळी शर्मिला आणि आमच्या बरोबरचे दोघे तिघे जण खाली कसिनोमध्ये गेलो. मला जुगार खेळता येत नाही. 5 वर्षातून एकदा खेळतो. आतमध्ये गेलो तिकडे भिंगऱ्या भिंगऱ्या फिरवत होते. मी 10 मिनीटांत बाहेर पडलो. त्यानंतर मी बाहेर आलो तिकडे एक बार होता. तिथे बसलो", असे मनसे अध्यक्ष राजे ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या सभेनंतर राज ठाकरे यांनी नीलम राणे यांची भेट घेतली.