Vinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटले
Vinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटले
रमाकांत आचरेकर स्मृती अनावरण सोहळ्यासाठी मंगळवारी ३ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठ-मोठ्या लोकांसमोर पार पडला. सचिन तेंडुलकर, संजय बांगर, पारस म्हांबरे, प्रवीण आंब्रे, समीर दिघे, बलबिंदर संधू - महाराष्ट्राचे राजकीय नेते राज ठाकरे यांच्यासमवेत भारतीय दिग्गजांनी स्मारकाचे अनावरण केल्यानंतर एका मंचावर एकत्र दिसले.
आजारी विनोद कांबळीही त्यांच्या तब्येतीच्या चिंतेनंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसले. सचिन आणि कांबळी या बालपणीच्या दोन मित्रांनीही सोहळ्यादरम्यान काही क्षण शेअर केले. २०१९ मध्ये आचरेकर गुरुजींचे निधन झाले होते. आचरेकर यांनी भारतासाठी खेळलेल्या अनेक खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन दिले होते. तेंडुलकर आणि कांबळी यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीला आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तेंडुलकर आणि कांबळी आणि यांसारख्या अनेक खेळाडूंनी सुरुवातीच्या काळात त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. हा कार्यक्रम त्यांच्या चिरंतन वारसाला श्रद्धांजली वाहणारा होता.