Raj Thackeray Meets Eknath Shinde : केडीएमसीत मनसे नगरसेवकांच्या पाठिंब्याबद्दल शिंदेनी आभार मानले

Continues below advertisement

Raj Thackeray Meets Eknath Shinde  : केडीएमसीत मनसे नगरसेवकांच्या पाठिंब्याबद्दल शिंदेनी आभार मानले

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (18 फेब्रवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील नंदनवन निवास्थानी भेट घेतली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीच्या निकालानंतर मनसेने शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर ही भेट झाल्याने भूवया उंचावल्या आहेत. KDMC निकालानंतर राजकीय हालचालींना वेग
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेला मनसेकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे. स्थानिक पातळीवरील सत्तास्थापनेसाठी मनसेचा पाठिंबा निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.  राज ठाकरे यांनी कोणता शब्द दिला?
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानल्याची सूत्रांनी माहिती दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहिल असे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे.शिंदेंकडून राज ठाकरे यांचे कौतुक
भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “राज ठाकरे यांनी वैयक्तिक राजकीय फायद्यापेक्षा व्यापक विकासाला प्राधान्य दिले आहे.” शिंदे यांच्या मते, भाजप-शिवसेना युती ही तात्पुरती नसून आता त्यात मनसेचाही समावेश झाल्याने ही युती अधिक मजबूत झाली आहे. यापूर्वीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेने त्यांना पाठिंबा दिल्याची आठवण शिंदे यांनी करून दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola