Sunetra Pawar first Speech Shivneri : कठीण प्रसंगात शपथ घेतली, शिवरायांच्या साक्षीने पहिलं भाषण

Sunetra Pawar first Speech Shivneri : कठीण प्रसंगात शपथ घेतली, शिवरायांच्या साक्षीने पहिलं भाषण

 महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारताचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती आहे. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवभक्तांचा मोठा जल्लोष, पारंपरिक वाद्ये आणि 'जय भवानी, जय शिवाजी' च्या घोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव पार पडला. उपमुख्यमंत्री नात्याने सुनेत्रा पवारयांचा हा पहिलाच शासकीय कार्यक्रम होता. यावेळी भाषण करत असताना सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, यापुर्वी अनेक वेळा मी छत्रपती शिवाजी महाराजाचं दर्शन घेण्याची संधी आली. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती. ज्या कठीण प्रसंगी मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी माझ्या नजरेसमोर जिजाऊ होत्या. अजित पवारांनी आयुष्यभर ज्या फुले-शाहू-आंबेडकर विचारांनी वाटचाल केली तो विचार मी आयुष्यात कधीही सोडणार नाही, हे तुम्हाला मी आश्वासन देते. याच ठिकाणी अजितदादांनी अनेकदा भाषण दिलेले आहे, असं बोलताना सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला. अजितदादांना या शिवनेरी किल्ल्याबद्दल जिव्हाळा तर होताच पण या शिवनेरी किल्लयाचे सुशोभीकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola