Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?
Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?
विधानसभा निवडणुकांसाठी दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 8 नो्व्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. तर, राज्यातही महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भानंतर आजपासून मुंबईतील मतदारसंघात सभा घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) घाटकोपर (प) विधानसभेचे उमेदवार गणेश चुक्कल यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी (Raj Thackeray) घाटकोपर येथे सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मुंबईकरांना भावनिक आवाहन केल्याचं पाहायला मिळालं. सारखं सभामध्ये नवीन काय बोलणार, आज अमरावतीहून आलो, उद्या परत गुहाघरला जायचंय. पण, तरीही आपल्याकडे विषयांची काही कमी नाही, असे म्हणत मुंबईचा नुसता विचका झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. मुंबईत किती गाड्या येतायत, किती लोकं येतायत, फुटपाथ उरलेले नाहीत, असे म्हणत मुंबईची तुंबई झाल्याचं त्यांनी सूचवलं.
मनसेनं आजवर केलेल्या कामांचं एक पुस्तक काढलंय, बाकी कुठल्या पक्षात हिंमत आहे का?. सन 2006-2014 सारखं पत्रकार विचारायचे, "काय ते ब्लू प्रिंटचं काय झालं"?. 2014 ला ती आणली कोणी पाहिली?, असा सवाल राज यांनी विचारला. मनसेनं इतकी वर्षे आंदोलनं केली, तेव्हा मुंबईत टोलनाके बंद झाले, पण त्याचं श्रेय आम्हाला कुणी देत नाही. मराठी पाट्या मनसेमुळे आज मुंबईच्या दुकानांवर दिसत आहेत. पाटी स्वस्त की दुकान?, म्हणून त्यांनी पाट्या मराठीत केल्या, मोबाईल फोन कंपन्यांना दणका दिला, तेव्हा संदेश मराठीतून आले. मशिदींवरच्या भोग्यांसमोर हनुमान चालिसा लावली तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, तीन प्राण्यांचं ते सरकार होतं. मशिदींवरच्या भोग्यांबाबत 17 हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले, अनेक मुसलमानांनीही भोग्यांच्याविरोधात मनसेचं कौतूक केलं. तेव्हा सरकारनं साथ दिली असती तर आज राज्यात एकाही मशिदीवर भोंगा राहिला नसता, असे म्हणत पुन्हा एकदा राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला.