Raj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा
Raj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा
रेणापूर, लातूरमधे सभा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचार सभेसाठी राज ठाकरे यांची उपस्थिती.... राज ठाकरे भाषण मोठे भाषण करायला येथे आलो नाही.... मी संतोष साठी आलो.... मतदाराचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे .... येथे येत असताना चायनीज ची गाडी पाहिली.... रोज तेच तेच खावून कंटाळा आला तर काही तरी वेगळे खातो की नाही .... संतोष नागरगोजे सारखा व्यक्ती अनेक वर्ष राजकारण करत आहे ..... त्याचा विचार करावा रेनापुरात पाटी पाहिली पुण्यात घर हवे का अशी पाटी पाहिली.... मराठवाडा सोडून येथील तरुण गाव सोडून जात आहेत... ही लाजिरवाणी बाब आहे... येथील राजकारणी काय करतायत... आपल्या भागात राहून कामधंदा करावा असे का वाटत नाही... त्यात दिवसेंदिवस आपण राजकारण खराब करत आहोत... धाराशिव येथे काही होण्यापूर्वी आलो होतो त्यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करताना काही लोकांना बोलावले त्यांना स्पथ सागितले की नोकऱ्या नाहीत आता... जेथे नोकरी नाही तेथे आपण आरक्षणावरून भांडत आहोत... साधू संताची भूमी असलेल्या मराठवाड्यात आता जातीपाती वरून भांडत आहोत. विषय शिक्षणाचा आहे... विषय नोकरीचा आहे.... विषय आरक्षणाचा नव्हे तर जो शिक्षण घेत आहे त्याच्या हाताला काम मिळाले पाहिजे....विषय त्याचा आहे आपल्या राज्यात एक ही तरुण तरुणी हाताला कामाशिवाय राहणार नाही याची काळजी घ्यावी .... राज्यातल्या मुला मुलींना शंभर टक्के रोजगार मिळणार अपेक्षितच आहे... खाजगी कंपनीत आरक्षण नाही ते आरक्षण देते ही नाहीत.... उद्या उद्योगधंदे महाराष्ट्रात करायचे असतील तर राज्यातीलच मुले नोकरीला घ्यावी लागतील... बाहेरची मुले मला चालणार नाहीत.... कसल्या जातीपातीचा विषय घेऊन बसला आहात... मुंबईत मराठ्यांचा पहिला मोर्चा आला होता... मला आजही आठवतं की त्या मंचावर शिवसेना काँग्रेस भाजपा यासारखी सगळे पक्षांची लोकं हजर होती... सगळेच सांगतायत मराठा समाजाला आरक्षण देऊ मात्र आतापर्यंत का दिले नाही... मराठा समाजाचे शिस्तबद्ध मोर्चे मी आजपर्यंत इतिहासाता पाहिले नाहीत... तरुण मुली आणि महिलांना पळून नेण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.... बाकीच्या अनेक गोष्टी घडत आहेत... पाण्याचा प्रश्न गंभीर आहे... शेतीचा विषय आर्थिक तोट्याचा आहे... माणसे मराठवाडा सोडून बाहेर पडत आहेत... म्हणून नवीन अनेक विषय तयार केली जातात... त्यामुळे तुमचा मूळ विषयापासून लांब जाणे शक्य होईल... ज्या लातूरला राज्याला दोन मुख्यमंत्री दिले... त्यांच्या जिल्ह्यात रस्ता नाही... शिवराज पाटीलचा सतत खासदार राहिले आहेत... लातूर जिल्ह्यात रस्ते नाहीत वीज नाही पाणी नाही.. नोकरी नाही... मागील 40 वर्षापासून राजकारण कशासाठी करत आहे मागील 40 वर्षापासून राजकारणात संधी मिळालेले शरद पवार.... यांनी बारामती तालुक्यात अनेक उद्योगधंदे आणले.... मात्र त्यांनी उर्वरित महाराष्ट्राचा कधी विचार केला नाही मराठवाड्यात उद्योग धंदे नाहीत विदर्भात नाहीत... मनसेच्या उमेदवाराला निवडून दिले तरच बदल घडेल.... भाषण संपले