Balasaheb Sancheti Home Raid : वैजापुरात प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब संचेतीच्या घरावर छापे

Continues below advertisement

Balasaheb Sancheti Home Raid : वैजापुरात प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब संचेतीच्या घरावर छापे

शहरात विक्रम सुराणा यांच्या घरी ही छापे मारी .बाळासाहेब संचेती यांच्या बहिणीचा मुलगा आहे .वैजापूर को ऑपरेटिव्ह बँकेचा संचालक आहेत

हे ही वाचा....

दिवाळीचा सण पार पडल्यानंतर काल महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरमधून (Kolhapur) करण्यात आला. कोल्हापूरमधून प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा ही शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत कोल्हापूरमधून प्रचाराचा नारळ फोडला. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार हातकलंगलेमधील अशोकराव माने आणि शिरोळमधील अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी भव्य सभा पार पडल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के पी पाटील यांच्यासाठी आदमापुरत सभा झाली. 

प्रचाराचा शुभारंभ होत असल्याने दोन्ही नेत्यांच्या सभांकडे अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या राज्याचे लक्ष होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार आणि महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे लक्ष होते. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा करवीर निवासिनी अंबाबाई आणि आदमापुरात बाळूमामांचे दर्शन घेतल्यानंतर के पी पाटील यांच्यासाठी सभा घेतली. या सभेला आमदार सतेज पाटील आणि शाहू महाराज सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे कोल्हापूरच्या उत्तरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टायमिंग साधताना सतेज पाटील व्यासपीठावर समोर बोलावत यावेळी ते सोबत असल्याचे सांगितले. तसेच केपींच्या विजयाची जबाबदारी सुद्धा दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram