Raj Thackeray Goregaon Interview : मुलाखत घेणं शक्य नाही... राज ठाकरेंनी का रद्द केला कार्यक्रम?

Continues below advertisement

मुंबई : दिंडोशी येथील सांस्कृतिक कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) मुलाखत घेणार होती. पंरतु पावसामुळे ही मुलाखत रद्द करण्यात आली. पाऊस असल्यानं मुलाखत घेणं शक्य नसल्याचं यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं. मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) परिसरात दिंडोशी येथे काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात येणार होती. परंतु मुंबईसह उपनगरात देखील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ही मुलाखत घेणं शक्य नसल्याचं स्वत: राज ठाकरे यांनी सांगितलं. 

मी याच ठिकाणी पुन्हा मुलाखतीसाठी येईन - राज ठाकरे

मुलाखत सुरु असताना व्यासपीठावर छप्पर असेल आणि तुमच्या नाही. त्यात पाऊस देखील पडतोय. अशा परिस्थितीमध्ये मी काही मुलाखत देऊ इच्छित नाही. मी त्यांना हे छप्पर काढत येईल का, असं देखील विचारलं. पण ते आता शक्य नाही. त्यामुळे आजची मुलाखत आपण स्थगित करु. पण याच महिन्याची पुढची तारीख निवडून इथे मुलाखतीसाठी येईन, असा माझा शब्द आहे. त्यावेळी मी तुमच्यासमोर राज्यातील राजकीय घडामोडींबाबत भाष्य करेन. पाऊस पडत असतानाही मी मुद्दाम तुमच्या समोर आलोय. कारण मला तुम्हाला भेटायचं होतं. पुढच्या मुलाखतीसाठी तुम्ही सगळ्यांनी यावं हे निमंत्रण मी आताच तुम्हाला देतोय, असं राज ठाकरेंनी म्हटलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram