Voter List Row: 'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं', Raj Thackeray यांचा हल्लाबोल

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदार याद्यांमधील (Voter Lists) त्रुटींवरून आणि दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) मुद्द्यावरून राज्य निवडणूक आयोगावर (State Election Commission) तीव्र शब्दात टीका केली आहे. 'निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे, हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे', अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. दुबार मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील अनेक घोळांवर पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता आले नाही, असे ते म्हणाले. जबाबदारी झटकून आता उत्तरदायित्वही नाकारणाऱ्या आयोगाच्या पदांचा उपयोग काय, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मतदानाचा हा ढळढळीत अपमान असून, याचा उगम कुठून आहे हे जनतेने पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. ठाकरे यांनी प्रश्न विचारून आयोगाला धारेवर धरणाऱ्या पत्रकारांचे आभार मानले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola