Raj Thackeray Aditya Thackeray Ayodhya : मे महिन्यात आदित्य ठाकरे,तर जून महिन्यात राज ठाकरे अयोध्येत
मनसेचं इंजिन हिंदुत्त्वाच्या रुळावर धावायला लागलंय.. आणि हे इंजिन अधिक जोमानं पळतंय हे अधोरेखित करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत... ५ जूनला राज ठाकरे कार्यकर्त्यांसह अयोध्येला जाणार आहेत. काल पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. त्याचप्रमाणे राज ठाकरे १ मे ला औरंगाबादेत सभा घेणार आहेत. दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी आदित्य ठाकरे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार आहे. त्यामुळं अयोध्येचा राम कुणाला पावणार? कुणाचं हिंदुत्त्व मतदारांना भावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
Tags :
Shiv Sena Abp Majha Raj Thackeray Ayodhya Aditya Thackeray MNS ABP Majha Raj Thackeray Pune Tour Aditya Thackeray Ayodhya Visit