Raj Thackeray : मतदारयादीत ९६ लाख बोगस मतदार? राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील नेस्को सेंटरमधील (Nesco Center) पक्षाच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्राच्या मतदार यादीत (Voter List) तब्बल ९६ लाख बोगस मतदार घुसल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 'जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत,' असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला. जोपर्यंत याद्या स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हानही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी आठ ते साडेआठ लाख बोगस मतदार असल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad), सतीश चव्हाण (Satish Chavan) आणि मंदार म्हात्रे (Mandar Mhatre) यांचे व्हिडिओ दाखवून ते सुद्धा मतदार यादीतील गोंधळाबद्दल बोलत असल्याचे म्हटले. हा संपूर्ण महाराष्ट्र अंबानींना अंगण म्हणून द्यायचा आहे का, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement