MVA Politics: 'नवा भिडू नको', काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा विरोध

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडीमध्ये (MVA) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संभाव्य प्रवेशावरून मोठी चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमध्ये (Congress) मतभेद असल्याचे दिसून येत आहे. 'दिल्लीमध्ये महाविकास आघाडी जेव्हा आली, तेव्हा सर्व पक्ष नेत्यांचा समावेश व्हावा याचा निर्णय त्यांच्या हायकमांडीने घेतलेला होता', असे विधान नाना पटोले यांनी केले आहे. एकीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 'नवा भिडू नको' म्हणत मनसेच्या (MNS) समावेशाला विरोध दर्शवला होता, तर दुसरीकडे नाना पटोले यांनी हा निर्णय दिल्लीतील हायकमांडचा असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळात हजेरी लावल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola