Voter List Row: 'मॅच फिक्सिंग झालंय, निकाल आधीच ठरलाय', Raj Thackeray यांचा निवडणूक आयोगावर आरोप
Continues below advertisement
मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीत (Voter List) तब्बल ९६ लाख खोटे मतदार असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मुंबईतील नेस्को मैदानावर (Nesco Ground) झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. 'तुम्ही मतदान करा किंवा नका करू, रिझल्ट अगोदर ठरलेला आहे कारण मॅच फिक्सिंग झालेलं आहे', असा घणाघात राज ठाकरेंनी केला. जोपर्यंत मतदार याद्या साफ होत नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान देखील त्यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) दिले. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी आठ ते साडेआठ लाख, तसेच पुणे आणि नाशिकमध्येही बोगस मतदार वाढवल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement