Murlidhar Mohal : '...जमीन चोर निघाला मुरलीधर', Ravindra Dhangekar यांचा थेट Muralidhar Mohol यांच्यावर निशाणा!

Continues below advertisement
पुण्यातील राजकारण तापलं असून, शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर..!', अशा शब्दात धंगेकर यांनी मोहोळांवर निशाणा साधला आहे. पुण्यातील जयकुमार बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून हा वाद उफाळून आला आहे. मोहोळ यांनी एका बांधकाम व्यावसायिकासोबत मिळून २३० कोटी रुपयांची ही जमीन हडपल्याचा आरोप धंगेकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आरोपांमुळे भाजप आणि शिंदे गट या महायुतीच्या दोन प्रमुख पक्षांमध्येच पुण्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मोहोळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, संबंधित कंपनीतून आपण वर्षभरापूर्वीच बाहेर पडल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola