Raj Thackeray : मतदार यादीत ९६ लाख बोगस मतदार, राज ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यात बोगस मतदारांच्या (Bogus Voters) मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'महाराष्ट्रातल्या मतदार यादीमध्ये तब्बल शहाण्णव लाख खोटे मतदार घुसवले गेल्याचा मोठा दावा राज ठाकरेंनी केलाय'. या गंभीर आरोपानंतर, शिंदे सरकारच्या शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. शंभूराज देसाई यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले आहे की, जर ९६ लाख खोटे मतदार असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाला द्यावेत, आयोग नक्कीच कारवाई करेल. इतकेच नाही तर, देसाई यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना खासदारकीचा राजीनामा देऊन भांडुपच्या वॉर्डातून पालिका निवडणूक जिंकून दाखवावी, असे थेट आव्हानही दिले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement