Voter List : मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार?, राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये (NESCO, Goregaon) झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात निवडणूक आयोग (Election Commission) आणि सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत,' असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला. जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे थेट आव्हान त्यांनी सरकारला दिले. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक जुना व्हिडीओ दाखवला, ज्यात मोदी स्वतः निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करत होते. यासोबतच, सत्ताधारी पक्षाचे आमदार विलास भुमरे (Vilas Bhumre) यांनी 'निवडणुकीत वीस हजार मतं बाहेरून आणली' अशी कबुली दिल्याचा दावाही त्यांनी केला. निवडणूक आयोगावर आम्ही बोलत असताना सत्ताधारी भाजपला मिरची का लागते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola