Special Report Thane Battle: 'ठिकऱ्या उडवतील म्हणणाऱ्यांच्या हातात लोक टिकल्या देतील'
Continues below advertisement
ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. 'ठिकऱ्या उडवतील म्हणणाऱ्यांच्या हातामागे लोकं टिकल्या देतील', असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना लगावला. राऊत यांनी ठाण्यात ठाकरे बंधू (Thackeray Brothers) एकत्र येणार असल्याची घोषणा केली होती. शिवसेना (UBT) आणि मनसे (MNS) एकत्र येऊन ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवणार असून 'आमचाही नारा पंच्याहत्तर पार आहे' असे राऊत म्हणाले. यावर शिंदेनी पलटवार करत राऊतांची वक्तव्ये म्हणजे 'बोलाची कढी आणि बोलाचाच भात' असल्याची टीका केली आणि आगामी सर्व निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement