Raj Thackeray यांचं हिंदुत्व शिवसेनेपेक्षा वरचढ ठरेल? ABP Majha Web Exclusive

काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टीका केली. 2019 साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पाहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसून आलं. या मेळाव्यात लक्षवेधी विषय ठरला तो म्हणजे हिंदुत्वाचा. नव्हेंबर 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झालं आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केली. यानंतर शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचे अनेक आरोप झाले. त्यामुळे शिवसेनेने रिकामी केलेली ही हिंदुत्वाची स्पेस आता मनसे भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला काय वाटतं? मनसे हिंदुत्वाच्या भूमिकेत शिवसेनेपेक्षा अधिक वरचढ ठरेल? 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola