Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

Continues below advertisement

Raj Thackeray 2008 Railway Protest Case Decision: 2008 साली रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून (2008 Railway Protest Case) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने आज (21 मे) निकाल दिला आहे.  तब्बल 18 वर्षांनी सदर प्रकरणाचा न्यायालयाने निकाल जाहीर केला. या सुनावणीवेळी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते. 

सरकारी पक्षाने गुन्हा सिध्द होईल आणि आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे मांडले नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्यामुळे पुराव्यानभावी राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (Raj Thackeray 2008 Railway Protest Case)

ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर राज ठाकरेंनी केले? (Raj Thackeray 2008 Railway Protest Case)

राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी न्यायालयाने राज ठाकरेंसह 8 लोकांना आज निर्दोष सोडले आहे. सगळीकडे तरूणांनी आंदोलने केली त्यांचा संबंध राज ठाकरेंशी जोडला होता. राज ठाकरेंना या प्रकरणात तत्कालीन सरकारने अडकवण्याचा प्रयत्न केला, असं अविनाश जाधव म्हणाले. राज ठाकरेंनी निकालानंतर स्मितहास्य केलं. तसेच न्यायालयातून खाली येताना अस्वालाच्या अंगावरचा एक केस कमी असं राज ठाकरे म्हणाले, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola