Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Cockroach Janta Party, Abhijeet Dipke on Election Commission: सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना देशातील बेरोजगार तरुणाईला झुरळासोबत तुलना करत संतापाला वाट मोकळी करून दिली. यानंतर झालेल्या सोशल मीडियातील उद्रेकात मराठी तरुणानं थेट काॅकरोच जनता पार्टी स्थापन करत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिली. बघता बघता याच पार्टीनं इन्स्टावर जगातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपला मागे टाकलं आहे. या पक्षाने केलेला जाहीरनामा सुद्धा चर्चेत असून तरुणाईने अभिजितच्या उपहासात्मक मोहिमेला जबरदस्त पाठबळ दिलं आहे. त्यामुळे अभिजितच्या काॅकरोच जनता पार्टीची चर्चा रंगली आहे.
एबीपी माझाने अभिजित दीपकेशी संवाद साधला. यावेळी त्याने निर्भिडपणे तरुणांच्या मनातील दाहकता मांडताना निवडणूक आयोगाच्या कारभाराची सुद्धा चिरफाड केली. यावेळी त्याने लोकसभेला महाराष्ट्रात धुळदाण झालेल्या भाजपला विधानसभेला अशी कोणती छडी मिळाली ज्यामुळे इतकं यश मिळालं? अशी विचारणा केली.
लोकसभेत भाजपला फक्त नऊ जागांवर आणून ठेवलं होतं
अभिजित दीपके म्हणाला, आमचा दुसरा मुद्दा इलेक्शन कमिशनवर आहे. मागील काही इलेक्शनमध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात 50 हजार मतं डिलीट झाली, त्या काही 15 हजार मतांनी हारल्या. एम. के. स्टॅलिन 15 हजार मतांनी हारले. दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या सीटवर 40 हजार मतं डिलीट झाली, ते चार-पाच हजार मतांनी हारले. आपल्या महाराष्ट्रात काय झालं? लोकसभेत भाजपला फक्त नऊ जागांवर आणून ठेवलं होतं. चार-पाच महिन्यांनंतर तीच भाजप 132 जागा घेऊन बसली. जिथे जिथे मतं डिलीट होत आहेत, तिथे तिथे फक्त भाजपला फायदा होतोय आणि विरोधकांना नुकसान होतंय, हा पॅटर्न काय सांगतोय? असा सवाल अभिजितने केला.