Konkan Rain Update : पुढील 5 दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागानं वर्तवला अंदाज
राज्यात पुढील पाच दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. उर्वरित राज्यात पाऊस ओसरण्यास सुरुवात होणार आहे. ही स्थिती गुरुवारपर्यंत (३ ऑगस्ट) अशीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याशिवाय ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालॅण्ड, मणिपूर, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी मुसळधारांचा अंदाजही हवामान विभागाने शनिवारी व्यक्त केला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला.
Tags :
Konkan Meghalaya Assam Manipur Mizoram Arunachal Pradesh State Rainfall Forecast Meteorological Department Nagaland