Rain News | सिंधुदुर्ग, सांगली, बुलढाणा औरंगाबादमध्ये मुसळधार; धबधबे प्रवाहित, रुग्णालयात पाणी

Continues below advertisement
तळकोकणात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा ओसंडून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे सावडाव धबधब्याने रौद्र रूप धारण केले आहे. जिल्ह्यातील सर्वच धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले आहेत. कोरोनाचे संकट असल्यामुळे पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी बंदी असल्याने कोणीही पर्यटक किंवा स्थानिक याठिकाणी फिरकत नाही. मात्र सावडाव धबधब्याचा प्रवाह मोठा असून धबधब्याच हे रौद्र रूप पहायला मिळत आहे.

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. या परिसरात काल दिवसभरात अतिवृष्टी झाल्याने गेल्या 24 तासात 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ होत आहे. तर धरणातून 800 क्यूसेक्सने पाणी वारणा नदीत सोडल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram