Rain: पुढील 2 दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Continues below advertisement

आज आणि उद्या महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.  विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी  आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून  कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय नाशिक, पालघरसाठी आॅरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय तर इतर भागांमध्ये रिमझिम सरी बरसताहेत. मागील २ दिवसांपासून विदर्भात बरसणाऱ्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळली आणि बळीराजाला मोठा दिलासा मिळाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram