Unseasonal Rain : कोकणात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, चार दिवस उन्हाचा चटका कायम

Continues below advertisement

कोकणात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात चार दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याचा शक्यता आहे. उत्तर भारतातील राजस्थान, गुजरातचा कच्छ या भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तापमानाचा पारा 45 अंशांच्या आसपास पोहोचलाय. या भागाकडून राज्याकडे उष्ण वारे वाहतायत. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अंदमान बेटाकडे सरकलाय. या भागाकडूनही राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहतायत. त्यामुळे राज्यात तापमानाचा पारा वाढलाय. तसेच ढगाळ वातावरण तयार झालंय. या दोन्ही स्थितीच्या प्रभावामुळे दमट वातावरण देखील तयार झालंय. परिणामी, कमाल तापमानात वाढ झालीय. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात कमाल तापमानत लक्षणीय वाढ झालीय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram