Maharashtra Weather forecast : पुन्हा विजा कडाडणार, डिसेंबरमध्ये पाऊस बरसणार, हवामानाचा नवा अंदाज
Weather Report : राज्यात थंडी वाढली असताना, पुन्हा पाऊस बरसणार असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून नवा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रात 28 डिसेंबरला अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदियात पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. भंडारा,वर्धा, नागपूर, अमरावती, अकोल्यातही सरी कोसळणार अशी माहिती मिळाली आहे.